जेव्हा तुमच्या salesforce सिस्टम मध्ये खूप debug logs साठतात तेव्हा ते खूप जागा घेतात आणि तुम्ही डेव्हलपर कंसोल उघडला की salesforce तुम्हाला काही संदेश (एरर मेसेज ) देतो. त्यासाठी ते वेळीच नष्ट करणे गरजेचे असते. हे लॉग्स एक एक करून नष्ट करणे खूप वेळ खाऊ असते. तो वेळ वाचवण्यासाठी तुम्ही डेवलपर कंसोल किवा डेटा लोडर वापरू शकता.
या ब्लॉग मध्ये आपण दोन्ही मार्ग पाहणार आहोत.
डेव्हलपर कंसोल वापरून
- डेव्हलपर कंसोल उघडा
- कंसोल मध्ये सगळ्यात खाली असणारा “Query Editor” टॅब वर क्लिक करा.
- Use Tooling API वर चेक करा.
- ‘select id from apexlog’ ही क्वेरी execute करा.
- Query results मध्ये नष्ट करायचे रेकॉर्ड्स तुम्हाला दिसतील.
- सगळे रेकॉर्ड्स निवडा आणि Delete Row बटन वर क्लिक करा.
डेटा लोडर वापरुन
- डेटा लोडर एप्लीकेशन उघडा (नसेल तर तुमच्या मशीन मध्ये इन्स्टॉल करा.).
- डेटा लोडर मधून तुमच्या sandbox किंवा production मध्ये लॉगिन करा.
- एक्सपोर्ट बटन वर क्लिक करा.
- “Show all Salesforce objects” सेलेक्ट करा आणि “ApexLog” सर्च बॉक्स मध्ये टाइप करा.
- “ApexLog” पर्याय निवडा आणि रेकॉर्ड्स साठी फोल्डर निवडा आणि पुढे जा.
- ही क्वेरी “Select Id FROM ApexLog” क्वेरी बॉक्स मध्ये टाका.
- फिनिश बटन वर क्लिक करुन रेकॉर्ड्स फाइल मध्ये घ्या.
- आता आपण delete ऑपरेशन कडे वळू.
- Delete बटन वर क्लिक करा.
- पुढे “Show all Salesforce objects” सेलेक्ट करा आणि “ApexLog” सर्च बॉक्स मध्ये टाइप करा.
- “Apex Debug” पर्याय निवडा आणि मागे आपण साठवलेली रेकॉर्डस ची फाइल सेलेक्ट करा.
- पुढे “Create or edit Map” बटन वर क्लिक करा आणि Id map करा.
- पुढील स्क्रीन वर जाऊन हे रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी finish बटन वर क्लिक करा.